चार महिन्यांपूर्वी गिळलेले नाणे काढले पोटातून 

चार महिन्यांपूर्वी गिळलेले नाणे काढले पोटातून 

नागपूर - खेळता-खेळता त्याने पाच रुपयांचे नाणे गिळले. विष्ठेवाटे नाणे बाहेर निघाले असेल, या गैरसमजुतीतून चार महिन्यांपर्यंत आईवडील थांबले. चार महिन्यांनंतर पोटात त्रास होण्यास सुरुवात झाली. नाणे बाहेर येण्याऐवजी पोटात रुतून बसले. असह्य वेदना होत असल्याने आईवडिलांनी सुपर स्पेशालिटीचा मार्ग धरला. गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीच्या डॉक्‍टरांनी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना बास्केटचा वापर करीत (इन्डोस्कोपी) पोटात रुतून बसलेले नाणे बाहेर काढले. पाच रुपयांचे हे नाणे चार महिने पोटात असल्यामुळे काळेकुट्ट पडले होते. 

शेख अरबाज असे या सहा वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. मूळचे अमरावती जिल्ह्यातील भुगावचे. काही प्रमाणात गतिमंद आहे. त्याने नाणे गिळल्याची माहिती दिली. परंतु, विष्ठेतून निघेल, अशा अज्ञानातून सारेच गप्प राहिले. विशेष असे की, चार महिन्यांपूर्वीची घटना असल्यामुळे सारेच विसरले. विष्ठेवाटे हे नाणे निघून गेले, 

असाच समज आईवडिलांचा झाला. परंतु, हे नाणे पोटात रुतून बसले. आता पोटात दुखू लागले. वडील शेख रज्जाक शेख इमाम यांनी अमरावती येथील इर्विन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. परंतु, तिथे सोय नसल्यामुळे सुपर स्पेशालिटीला रेफर केले. डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात डॉ. नितीन गायकवाड, डॉ. अमोल समर्थ, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. हरीश कोठारी एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली. मुलाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांत सुटी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विभागाने यापूर्वी हिमांशू शैलेश क्षीरसागर (वय ७ वर्षे) आणि परी रामदास भोंडे (वय ३ वर्षे) या दोन चिमुकल्यांच्या पोटातून चार इंच खिळा तसेच बॅटरी काढली होती. शेख अरबाजच्या पोटातील नाणे वितळण्यास सुरुवात झाली होती. नाणे वितळले असते, तर मात्र धोका होता. शेख अरबाजची प्रकृती ठीक आहे.
-डॉ. सुधीर गुप्ता,  विभागप्रमुख, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com