मासेमारांच्या प्रश्‍नांवर आज गोलमेज परिषद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नागपूर- मासेमारांचे प्रश्‍न आणि सरकारचे धोरण या विषयावर ‘सकाळ’च्या पुढाकाराने आज एकदिवसीय ‘गोलमेज परिषदे’चे आयोजन केले आहे.  

अलीकडेच जाहीर झालेल्या मत्स्य ठेका धोरणांबाबत मासेमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे धोरण अन्यायकारक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या व्यवसायाशी निगडित सर्व बांधवांमध्ये संताप उसळला आहे. 

हे धोरण नक्की काय आहे, याचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण या गोलमेज परिषदेतून तज्ज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये सकाळी अकरापासून परिषदेला प्रारंभ होईल. 

परिषदांतून सकारात्मक उपक्रमांना गती 
‘सकाळ’ने यापूर्वी विविध समाजघटकांच्या प्रश्‍नांवर गोलमेज परिषदांचे आयोजन केले. त्यातून पुढे अनेक सकारात्मक उपक्रम सुरू झाले. विशेषतः गोवारी समाज, आदिवासी समाज आणि ओबीसी गोलमेज परिषदांचा समावेश आहे.