आज मुख्यमंत्र्यांच्या गावात भाजप-काँग्रेस आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावात आज शुक्रवारी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे प्रतिआंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

कर्जमाफी आणि सात-बारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. मध्य प्रदेशातील शेतकरीसुद्धा कर्जमाफीसाठी आंदोलन करीत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अटक करण्यात आली. याचा निषेध म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. आंदोलन हाणून पाडण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावात राज्य शासनातर्फे तसेच आमदार सागर मेघे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देऊन प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलनाची रूपरेषा तयार केली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येणार असल्याने फेटरीमध्ये मोठा भडका उडण्याची शक्‍यता आहे.