लक्ष्मी यादव आणि पुत्रांची हायकोर्टात धाव

लक्ष्मी यादव आणि पुत्रांची हायकोर्टात धाव

नागपूर - फटाके फोडण्याच्या वादावरून झालेल्या मारहाणप्रकरणी नगरसेविका लक्ष्मी यादव आणि दोन्ही मुले करण व अर्जुन यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. ३१) सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेला नागपूर भाजपचा नेता मुन्ना यादव व त्याच्या दोन्ही मुलांची गुंडागर्दी अद्याप थांबलेली नाही. नागपूर शहरातील अजनी भागात मुन्नाच्या दोन्ही मुलांनी गुंडागर्दी करत चांगलाच राडा केला व सामान्यांना वेठीस धरले. पापा यादव यांची बहीण भाऊबीजेनिमित्त घरी आली असता पूर्व वैमनस्यातून मुन्ना यादव याची पत्नी लक्ष्मी  यादव व मुलगा करण व अर्जुन यांनी बाला यादवच्या घरावर हल्ला चढवला. त्यांच्या घरातील महिलांना मारहाण केली आणि प्रतिकारासाठी धावलेल्या बाला यादव आणि मंगल यादव यांनादेखील जबर मारहाण करण्यात आली. घटनेच्या वेळी दोन्ही गटातील गुंडांनी राडा करत तोडफोड केली. पापा यादव याच्या फिर्यादीवरून भाजप नेता मुन्ना यादव, दोन्ही मुले करण व अर्जुन आणि पत्नी नगरसेविका लक्ष्मी यादव यांच्यावर हत्येच्या प्रयत्न करणे, जमावाला भडकावून मारहाण  करण्याचा गुन्हा धंतोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अटक टाळण्यासाठी लक्ष्मी यादव आणि दोन्ही मुलांनी नागपूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, तो फेटाळण्यात आला. यामुळे आता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर, वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता, ॲड. उदय डबले आणि ॲड. निखिल गायकवाड कामकाज पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com