स्पॅनकोवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर - स्पॅनको कंपनीने हजारो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. त्यांचा मानसिक छळ केला असल्याचा अहवाल सत्य शोधन समितीने सादर केला आहे. त्यानुसार कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वीज ग्राहकांची गुंडगिरीतून मुक्तता करण्याची मागणी नागपूर शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली. 

नागपूर - स्पॅनको कंपनीने हजारो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. त्यांचा मानसिक छळ केला असल्याचा अहवाल सत्य शोधन समितीने सादर केला आहे. त्यानुसार कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वीज ग्राहकांची गुंडगिरीतून मुक्तता करण्याची मागणी नागपूर शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली. 

स्पॅनकोविरोधात येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन ऊर्जा मंत्रालयाने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. तो अहवाल मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. एकूण 469 पैकी 121 तक्रारी समितीने केल्या होत्या. मीटर, बिलिंग, वीजचोरी अशा प्रकारच्या 9 हजार 922 तक्रारींवर सत्य शोधन समितीने चौकशी केली. समितीच्या अहवालानुरास प्रतिमीटर तपासणीच्या नावावर कंपनीने 150 रुपये याप्रमाणे ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये वसूल केले. याचा हिशेबसुद्धा कंपनीकडे नाही तसेच कंपनीकडे कुठलीही तांत्रिक प्रयोगशाळा नाही. फक्त दोषपूर्ण मीटर बदलावायचे असताना कंपनीने जबरदस्तीने सर्वांचेच मीटर बदलविले. वीजचोरीच्या प्रकरणामुळे अनेकांकडून जोरजबरदस्ती आणि धमकावून स्वाक्षऱ्या घेतल्याचे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनीच समितीला सांगितले. विद्युत नियामक आयोगाचे निर्देश व विद्युत कायद्याचेही स्पॅनकोने हनन करून शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे कायद्यानुसार कठोर कारवाईची शिफारस सत्यशोधन समितीने केली आहे. 

नागपूर शहर सुधार समितीचे समन्वयक प्रवीण राऊत यांच्याकडे वीजबिलवाढीच्या तक्रारी आल्या होत्या. समितीने आवाज उठवल्यानंतर ईश्‍वर झिलपे यांचे 12 हजारांचे बिल 2100 रुपये, फय्याजुल हसन यांचे सहा हजारांचे 600 रुपये कमी केले होते. मात्र, अनेकांनी तक्रारी केल्या नाही आणि मुकाट्याने बिल भरले. फक्त उदाहरणादाखल वाढीव बिलाचे आकडे बघितल्यास स्पॅनकोने कोट्यवधी रुपयांनी नागरिकांना फसवल्याचे स्पष्ट होते. सत्ताधाऱ्यांनीच नेमलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल आला आहे. आता त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा प्रवीण राऊत यांनी दिला. 

टॅग्स