पिस्तुलासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - सीताबर्डी पोलिसांनी दुचाकीने जाणाऱ्या दोन संशयित युवकांचा पाठलाग केला. थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला, तर दुसरा पसार झाला. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्यालाही अटक केली. सत्या ऊर्फ सतीश ताराचंद चन्ने (२८, रा. पांढराबोडी) व विनोद मोतीराम मोहड (४७, रा. गोपालनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले आणि दोन जिवंत  काडतुसे ताब्यात घेतले. सेवक तुलाराम मसराम (रा. खरे टाऊन, धरमपेठ) व बंटी नरहरी मेश्राम (रा. पांढराबोडी) हे दोघे फरार आहेत. सेवक मसराम हा कुख्यात गुंड असून, पांढराबोडीमध्ये गॅंग चालवतो. सत्या चन्ने त्याचा जवळचा असल्याची माहिती आहे. मसराम  गॅंगचे अनेकदा विरोधी गॅंगशी खटके उडाले असून, त्यांच्यावर खुनाचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत. ही कारवाई पीआय सत्यवीर बंडीवार, पीएसआय काळे, समीर शेख, मंगेश, गजानन निशिथकर आणि विशाल यांनी केली. सीताबर्डी ठाण्याचे पीएसआय एस. बी. काळे पथकासह धरमपेठ परिसरातील लक्ष्मीभुवन चौकात वाहनांची तपासणी करीत होते. या वेळी चन्ने व बंटी मोटारसायकलवर संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला असता चन्ने हाती लागला. फरार आरोपीबाबत विचारपूस केली असता त्याचे नाव बंटी मेश्राम असल्याचे सांगितले. चौकशीत एक पिस्तूल मित्र सेवक मसरामला दिल्याचे त्याने सांगितले. पोलिस सेवकच्या घरी पोहोचले असता तो ही फरार होता. चन्नेच्या माहितीवरून पोलिसांनी विनोदच्या घरावर धाड टाकून अटक केली. त्याने कारमध्ये पिस्तूल लपवून ठेवल्याचे सांगितले.