कुख्यात वॉंटेड सुमित समुद्रेला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नागपूर - नागपुरातील कुख्यात आणि हत्याकांड आणि बलात्कारासह अन्य 39 गुन्ह्यांत वॉंटेड असलेल्या सुमित ऊर्फ सतीश शिवचरण समुद्रे (वय 41, बाबुलखेडा) याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुमितसह चोरीचे सोने विकत घेणारा सोनार आणि विक्री करून देणाऱ्या दलालास पोलिसांनी अटक केली. 

सतीश समूद्रे हा सोनसाखळी हिसकावून पळून जाण्यात तरबेज होता. त्याला दुचाकी आणि कार चालविण्यात तो पटाईत आहे. त्याने आतापर्यंत 11 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याने 12 सप्टेंबरला सकाळी साडेसहाला कल्याणी अपार्टमेंट सोनगाव येथे राहणाऱ्या ललिला अप्पूलिंगम यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अशाचप्रकारे त्याने सोनेगाव परिसरात चार, बजाजनगर, अजनी, प्रतापनगर, धंतोली, गणेशपेठ, सक्‍करदरा, नंदनवन आणि कळमना या पोलिस ठाण्याच्या हद्‌दीत चेनस्नॅचिंग केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि कार असा एकूण 10 लाख रूपयांचा मुद्‌देमाल पोलिसांनी जप्त केला. तो नागपुरात राहत नव्हता. केवळ चोरी करण्यासाठीच तो शहरात येत होता. तो पुन्हा गुन्हा करण्यासाठी शहरात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पथक क्रमांक तीनचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भेदोडकर आणि शत्रृघ्न कडू यांना माहिती मिळाली. त्याला सोमवारी सायंकाळी बाबुलखेड्यातील घरातून अटक केली.