व्यापारी आणि बिल्डर्सकडून एक कोटीच्या नोटा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - कोराडीतील एका बिल्डर आणि व्यापाऱ्याच्या निर्मनुष्य इमारतीत होणाऱ्या डिलिंगवर छापा मारून एक कोटी रुपयांच्या चलनातून बंद केलेल्या पाचशे आणि हजार  मूल्याच्या नोटा जप्त केल्या. या कारवाईमुळे हवालाचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसन्न मनोहर पारधी (वय ४४, रा. न्यू रामदासपेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्य आरोपींमध्ये वर्ध्याचा मोठा डॉक्‍टर आणि नागपुरातील मोठा कपडा व्यापारी आहे.

कोराडीतील इमारतीत अडीच कोटी रुपयांच्या नोटांचा व्यवहार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. त्यांनी लगेच पथक तयार करून गुप्तपणे सापळा रचला. पंटरने दिलेल्या माहितीनुसार, ते कोराडीतील राणा इमारतीत असलेल्या ३०१ क्रमांच्या फ्लॅटमध्ये गेले. तेथे छापा घातला. प्रसन्न पारधी याला अटक  करण्यात आली. त्याचे शहरात चार बिअर बार असून मद्यविक्रीच्या व्यवसायात गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. त्याच्याकडून एक कोटीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या. प्रसन्न पारधीने येथे अडीच कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची डिलिंग होत असल्याची कबुली दिली.  त्याने कुमार छुगानी हासुद्धा येथे एक कोटीची रक्‍कम घेऊन येत असल्याची त्यांनी माहिती दिली. मात्र, इमारतीत पोलिस असल्याची माहिती मिळताच छुगानीने पळ काढला. तर वर्ध्याचा मोठा डॉक्‍टरसुद्धा ५० लाख रुपये घेऊन येणार होता. मात्र, त्यानेही पळ काढला. मात्र, त्या दोघांच्याही शोधासाठी पोलिस पथक नेमण्यात आले.

लाखाचे मिळतात २५ हजार 
कुमार छुगानी हा मास्टरमाईंड असून, त्याचे काही बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. त्याचे सदरमध्ये कपड्याचे शोरूम आहेत. एक लाखाचे २५ हजार रुपये असा भाव तो देत होता. ती रक्‍कम बॅंकेत तो जमा करणार होता. त्यामुळे बॅंकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा या टोळीत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नोटांसाठी  सिक्रेट पासवर्ड 
कोराडी चौकात एसीपी वाघचौरे यांच्यासह अन्य एक अधिकारी  साध्या वेशात बॅंकेचे अधिकारी असल्याचे भासवून गेले. एका आरोपीने त्यांची चौकशी करून सिक्रेट पासवर्ड विचारला. त्यांनी पासवर्ड सांगितल्यानंतर त्यांना कार तेथेच पार्क करण्यास सांगितले. पायी चालत यांनी इमारतीत नेले. त्यानंतर रूम नंबर सांगितला. रूममध्ये पोहोचताच वाघचौरे यांनी दबा धरून बसलेल्या पथकाला बोलवून ट्रॅप केले.