बिल नाही तर वीज नाही

बिल नाही तर वीज नाही

नागपूर - महावितरणने शून्य थकबाकी संकल्पना साकारण्याचा ध्यास घेतला आहे. त्याअंतर्गत ‘बिल नाही तर वीज नाही’चा संदेश देत मंगळवारपासून नागपूर परिक्षेत्रात थकबाकीदारांची ‘वीज तोड’ मोहीम हाती घेण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी देयकांचा तातडीने भरणा करून कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाचही परिमंडळात एकूण ३९ लाखांहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे मार्च महिन्यात ४५.४४ कोटींवर आलेली थकबाकी सात महिन्यांत तब्बल २०९ कोटींवर पोहचली आहे. बिघडलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला असून पथके तयार करण्यात आली आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या पथकाकडे पैसे किंवा धनादेश देत वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्याचा प्रयत्न ग्राहकांकडून केला जातो. ही बाब लक्षात घेऊन यंदा  ग्राहकांकडून पैसे किंवा धनादेश स्वीकारू नये, तसेच वीजपुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुन्हा जोडू नये, असे आदेश पथकांना देण्यात आले आहे.

१९ हजार ग्राहकांकडील बत्तीगूल
मागील आठवड्यातच महावितरणने थकबाकीदारांविरोधात मोहीम राबविली. यात थकबाकीचा भरणा न करणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यांच्याकडे एकूण ८.९१ कोटींची थकबाकी होती. यात नागपूर परिमंडळात १.७२ कोटीच्या थकबाकीसाठी ५ हजार ८४६ ग्राहक, अकोला परिमंडळात ३ कोटींच्या थकबाकीसाठी ४ हजार ९८५ ग्राहक, अमरावती परिमंडळात ३.१३ कोटींच्या थकबाकीसाठी ५ हजार ६२१ ग्राहक, चंद्रपूर परिमंडळात ६३ लाखांच्या थकबाकीसाठी १ हजार ५९३ ग्राहक तर गोंदिया परिमंडलात ५४ लाखांच्या थकबाकीसाठी १ हजार ४३३ ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com