मासेमारांचे जगणे कठीण झाले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर - केंद्र सरकार व राज्य सरकार चुकीची धोरणे तयार करत आहेत. विदर्भातील सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. मत्स्य व्यवसायावर संकट कोसळले आहे. शेतकरी हवालदिल झाला. मासेमारीत उत्पन्नाचा स्त्रोत सहा टक्‍क्‍यांनी वाढल्याचे कारण पुढे करीत सरकारने साडेआठशे पटीने तलावांची लीज वाढवली. राज्यातील २५ लाख पारंपरिक मासेमारांचे जगणे कठीण झाले. अशावेळी खासदार नाना पटोले यांनी विदर्भातील सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्यांचे अश्रू या विषयावर भाष्य केले.

नागपूर - केंद्र सरकार व राज्य सरकार चुकीची धोरणे तयार करत आहेत. विदर्भातील सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. मत्स्य व्यवसायावर संकट कोसळले आहे. शेतकरी हवालदिल झाला. मासेमारीत उत्पन्नाचा स्त्रोत सहा टक्‍क्‍यांनी वाढल्याचे कारण पुढे करीत सरकारने साडेआठशे पटीने तलावांची लीज वाढवली. राज्यातील २५ लाख पारंपरिक मासेमारांचे जगणे कठीण झाले. अशावेळी खासदार नाना पटोले यांनी विदर्भातील सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्यांचे अश्रू या विषयावर भाष्य केले. पटोले यांनी सरकारवर केलेली टीका योग्य असून त्यांच्या पाठीशी सारा मासेमार समाज उभा आहे, अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश भोई समाज संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी स्पष्ट केली आहे. पटोलेंना पाठिंबा देण्यासाठी विदर्भात सभांचे आयोजन करण्यात येणार असून मासेमारी व्यवसाय धोक्‍यात आला आहे, याबद्दल जनजागरण करण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीनवेळा भेटूनही मासेमारी करणाऱ्या समाजाचे प्रश्‍न सुटले नाहीत. ‘आक्षेप नोंदवण्या’च्या मासेमारांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही. शेतीप्रमाणेच ‘मत्स्य’ हादेखील पारंपरिक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. परंतु मत्स्य व्यवसायात हातावर पोट असणाऱ्यांचे काय? असा सवाल पाटील  यांनी केला.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017