परवानगीसाठी मंडळांची यंदा होणार दमछाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिकेने यंदा झोन कार्यालयात सर्व परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली. मात्र, गणेशोत्सव मंडळांना पोलिस व वाहतूक पोलिसांची वेगळी परवानगी घ्यावी लागणार आहे. वेगवेगळ्या अटींच्या पूर्ततेसाठी मंडळांची चांगलीच दमछाक होणार आहे.

२५ ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव मंडळांची तयारी जोरात सुरू आहे. गणेशोत्सव आणि आकर्षक मंडप, स्वागतद्वार, व्यासपीठ, रोषणाई हे आता समीकरणच झाले आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या परवानगीसाठी अनेक कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागू नये, यासाठी महापालिकेने मागील वर्षी सिव्हिल लाइन्स मुख्य कार्यालयात एक खिडकी योजना सुरू केली आहे. परंतु, महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या परवानगीपूर्व पोलिसांची परवानगी घेणे आवश्‍यक होते.

पोलिसांची प्रक्रिया संथ असल्याने यंदा महापालिकेने पोलिसांसाठी फारकत घेतली आहे. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव मंडळांना संबंधित पोलिस ठाणे व वाहतूक पोलिसांची वेगळी परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानगीची प्रत महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या अर्जासोबत जोडून द्यावी लागणार आहे. दूरवर असलेल्या गणेशोत्सव मंडळांनाही सिव्हिल लाइनमध्ये यावे लागत होते. यंदा मात्र गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक झोन कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. महावितरण किंवा एसएनडीएल, पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी एकाच छताखाली गणेशोत्सव मंडळांना आवश्‍यक परवानगी देणार आहेत.