न्याय द्या, अन्याय दूर करा

नागपूर - राष्ट्रीय हलबा जमात महामंडळातर्फे आयोजित महामोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी ठरली.
नागपूर - राष्ट्रीय हलबा जमात महामंडळातर्फे आयोजित महामोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी ठरली.

नागपूर - शासनाकडून हलबा, हलबी जमातीवर जाचक अटी व शर्ती लादून केला  जाणारा अन्याय दूर करून न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी हलबा, हलबी समाज बांधवांनी विधानभवनावर धडक देत मागण्या लावून धरल्या. 

हलबाबांधवांनी बुधवारी एकाच दिवशी दोन वेगवेगळे मोर्चे काढून लक्ष वेधले, हे विशेष. राष्ट्रीय हलबा जमात महांडळातर्फे इंदोरा मैदार येथून काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व उदय धकाते यांनी केले. महिलांची मोर्चात लक्षणीय संख्येने उपस्थिती होती. शासन सेवेत कार्यरत या समाजातील समाजबांधवांना गैरआदिवासी दाखून सेवामुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या समाजावर प्रचंड प्रमाणात अन्याय होत असून शासनाने तो दूर करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. 

प्रमुख मागण्या
शासकीय सेवेतील हलबा, हलबी जमातीच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे
अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडे प्रलंबित प्रकरणे शासनाच्या निर्णयाशिवाय निकाली काढू नये
शासकीय, निमशासकीय, खासगी, अनुदानित, मंडळे, महामंडळे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व इतर कार्यालयांनी हलबा-हलबी जमातीचे अवैध प्रकरणात राज्यपाल व शासन निर्णयाशिवाय कारवाई करू नये.
हलबा, हलबी जमातीच्या प्रमाणपत्रासाठी १९५० पूर्वीच्या दाखल्याची अट रद्द करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com