आधी व्हायब्रंट विदर्भ करा - आशीष देशमुख

आधी व्हायब्रंट विदर्भ करा - आशीष देशमुख

नागपूर - मुख्यमंत्र्यांचा "मॅग्नेटिक महाराष्ट्र' हा उपक्रम चांगला असला तरी "व्हायब्रंट विदर्भ' याची जास्त गरज राज्याला असल्याचे सांगून आमदार आशीष देशमुख यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला. 

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट आणि नागपूर विद्यापीठाच्या वतीने "रोल ऑफ कल्चरल, एथोस ऍण्ड इंडिअन फिलॉसॉफी इन कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर जयराज साळगावकर, डॉ. शशिकला, डॉ. गिरीश गांधी, डॉ. बबन तायडे होते. वाणिज्य व उद्योगांनी उत्पादन आणि सेवा क्षेत्रांत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते. अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होते, असेही अध्यक्ष भाषनातून आमदार डॉ. आशीष देशमुख म्हणाले. 

सिंचनाचा अनुशेष व खराब प्रशासनामुळे विदर्भातील 32 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्‍चित करण्याच्या धोरणावर सध्याच्या सरकारने उत्पादन किंमतीपेक्षा 50 टक्‍के अधिक देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, अन्नधान्ये, कडधान्ये आणि कापसाचे भाव सतत कमी होत आहेत. या भागातील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या अभावामुळे ते रस्त्यावर फेकल्या जातात. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात विदर्भाला सर्वाधिक नुकसान झाले असले तरी महाराष्ट्र एक राज्य म्हणून यशस्वी ठरला आहे, असेही देशमुख म्हणाले. 

गुंतवणुकीचा वाटा कमी 
महाराष्ट्रात घरगुती आणि परदेशी दोन्ही प्रांतातून जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी आकर्षित कार्याचा प्रयत्न होत आहे. विदर्भातील गुंतवणुकीचा वाटा अत्यंत कमी आहे. चार वर्षांत विदर्भात केवळ 10 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा केला जात असला तरी ती फक्त कागदावरच आहे. त्यामुळे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी "व्हायब्रन्ट विदर्भ" ची गरज असल्याचेही आशीष देशमुख म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com