महावितरणच्या अभियंत्यावर हल्ला

महावितरणच्या अभियंत्यावर हल्ला

नागपूर - शेतातील अनधिकृत वीजपुरवठा तोडल्याने चिडलेल्या शेतकऱ्याने महावितरणचे सहायक अभियंते ब्रिजेशकुमार यादव यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून मारहाण करण्याच्या प्रयत्न केला. या प्रकरणी कुही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कुही ग्रामीण शाखेत कार्यरत आहेत. ते आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांसह अनधिकृत वीजजोडणी तपासण्यासाठी परिसरात पाहणी करीत होते.

नवरगाव येथे राहणारे सतीश अजाबराव माहुरे यांच्या शेतात आकडा टाकून वीजचोरी सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने चौकशी करीत आकडा टाकून वीज घेणे हे बेकायदेशीर असल्याचे माहुरे याला सांगण्यात आले. यामुळे चिडलेल्या माहुरेने प्रथम यादव यांच्यावर दगडफेक केली. नंतर मारहाणीचा प्रयत्न केला आणि अखेर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेले महावितरणचे कर्मचारी मदतीला धावल्याने पुढील अनर्थ टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com