'मोदींच्या राज्यात विचारस्वातंत्र्यावर गदा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नागपूर - स्वातंत्र्यपूर्व काळातील पुढाऱ्यांमध्ये विविध विचारसरणीचे लोक होते. स्वातंत्र्यासाठी कुणी हिंसेचा तर कुणी अहिंसेचा मार्ग निवडला होता. त्यांचा मार्ग कुठलाही असला तरी सर्वांना एकमेकांविषयी आदरभाव राहत असे. मात्र, मागील तीन वर्षात आलेल्या मोदी सरकारने लोकांच्या विचार स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. सरकारच्या विरोधात बोलणारा म्हणजे जणू देशद्रोही ठरविला जातो, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी केला. 

रायसोनी शिक्षण समूहातर्फे आयोजित "नॅशनल स्टुडंट पार्लमेंट'मध्ये "मीडिया : सत्यता की टीआरपी' या विषयावर आयोजित चर्चेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रायसोनी ग्रुपचे अध्यक्ष सुनील रायसोनी उपस्थित होते. आशुतोष म्हणाले, "गांधीजी आणि भगतसिंग यांच्यात मतभेद होते. गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही विचार वेगवेगळे होते. मात्र, विचार वेगळे असले तरी त्यांनी कधीही एकमेकांचा अनादार केला नाही. प्रत्येकाविषयी एकमेकांना सन्मान होता. मात्र, आज राजकारणात कुणालाही कुणाचा सन्मान राहिला नाही. आजच्या सरकारच्या विरोधात काहीही बोलले तरी लोक त्याला देशद्रोही ठरवितात. यात प्रसारमाध्यमांचाही मोठा वाटा असल्याची टीका आशुतोष यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाचा कुठलाही वाटा नसताना ते राष्ट्रवादाच्या गोष्टी करतात. 

यावेळी सुजाता डे म्हणाल्या, "देशात न्यूज चॅनलच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरविल्या जात आहे. त्याची शहानिशा केली जात नाही. केवळ काश्‍मीर, दहशतवाद, जेएनयूमधील घटनेवरच लक्ष देतात. त्यावर बोलण्यासाठी केवळ मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनाच का बोलाविण्यात येते? यातून तुम्ही त्यांच्याकडे त्याच मानसिकतेने बघता असे निष्पन्न होते. देशातील शासकीय शैक्षणिक संस्थाने टारगेट करून त्यांना संपवून अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींची शिक्षणाची दारे बंद करण्याचा डाव या सरकारचा असल्याचे ते म्हणाले. यावेळी कॉंग्रेसच्या डॉ. शमा मोहम्मद आणि सोशल मीडियात काम करणारे जेबक यांनीही आपले विचार व्यक्त केले. 

विचारस्वातंत्र्य संपतेय 
डॉ. हेडगेवारांना सोडले तर संघाचा एकतरी स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात उतरून तुरुंगात गेल्याचा पुरावा द्यावा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचारांचे स्वातंत्र्य असणे आवश्‍यक आहे. तो लोकशाहीचा पाया आहे. मात्र, देशातील विचारस्वातंत्र्य संपत असल्याने लोकशाहीलाही धोका असल्याचा आरोप आशुतोष यांनी केला.

Web Title: nagpur news narendra modi Ashutosh AAP