नासुप्र अधिकाऱ्याला दलालाकडून मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नागपूर - महापालिकेतील सहायक आयुक्तांना जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणासोबतच नासुप्र कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याला दलालाने मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण असून नासुप्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज लेखणीबंद आंदोलन केले. मारहाणप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नासुप्र अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. 

महापालिका व नासुप्रमध्ये जनतेची कामे केली जाते. त्यामुळे येथे दलालांचाही सुळसुळाटही आहे. काल, शुक्रवारी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना गौर नामक गुंडाने जीवे मारण्याची धमकी दिली. दुपारी महापालिकेतील या घटनेनंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास नासुप्रच्या उत्तर नागपूर विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता प्रमोद धनकर यांना सुनील मेश्राम व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी मारहाण केली. धनकर दुपारी चाडेचारच्या सुमारास नासुप्र कार्यालयात पोहोचले असतानाच आरोपी सुनील मेश्राम (रा. नारी रोड, नागपूर) व त्यांच्या तीन ते चार सहकाऱ्यांनी धनकर यांना अडविले. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. दरम्यान, कार्यालयातील इतर कर्मचारी धनकर यांच्या मदतीला धावले असता आरोपींनी पळ काढला. सदर प्रकरणी धनकर यांनी पाचपावली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्घ गुन्ह्याची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, नासुप्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मारहाणीची ही घटना पहिली नाही. या आरोपीने यापूर्वीदेखील अनेक अधिकाऱ्यांना मारहाण केली. तसेच धमकी दिल्याचे समजते. या प्रकरणांचा तपास सुरू आहे. आता पुन्हा धनकर यांना आरोपीने लक्ष्य केले. या प्रकरणात नासुप्र अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून आज नासुप्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. दुपारी बाराला कर्मचाऱ्यांनी नासुप्र कार्यालयापासून पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत पायी दिंडी काढली. त्यांनी पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे निवेदन देऊन आरोपीस अटेची मागणी केली. आयुक्तांनी कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर कामाला हात लावला. 

Web Title: nagpur news NMC assistant commissioner threatens to kill