शहरातील पोपट विक्रेते वनविभागाच्या रडारवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नागपूर - पोपटांची विक्री करणाऱ्याविरुद्ध वनविभागाने आता कठोर पावले उचलणे सुरू केले आहे. माणसांच्या हौशीखातर आयुष्यभर पिंजऱ्यात फडफडणारे पोपट मिठू मिठू करत मरून जातात. पोपटांची पिल्ले पकडून त्यांची विक्री करणाऱ्यांचे रॅकेटही मोठे आहे. या पार्श्‍वभूमीवर पोपट विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने दंड थोपटले आहे. त्यासाठी शहरातील लकडगंजसह विविध परिसरात वनविभागाचे कर्मचारी दररोज गस्त करीत असल्याने पोपट विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

वन्यजीव संरक्षण संस्थांनी वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही पोपटांची विक्री होते. तसेच पोपट घरी चोरून-लपून पाळले जात आहेत. त्यामुळे पोपटाचा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्यांना आता लगाम लावण्याचे वनविभागाने ठरविले आहे. वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मध्यंतरी पोपट पाळणाऱ्यांविरुद्ध २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, अद्याप तो निर्णय लालफीतशाहीत अडल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील लकडगंज, कॉटन मार्केट, इतवारी, मोमिनपुरा, कामठी रोड, शनिवार बाजार या परिसरात पोपटांची विक्री केली जात होती. पाच ऑगस्टला पाच आरोपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना वनकोठडी दिली. काहींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्याने पोपट विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, पोपट विक्रेतेही शहरातून फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे.   

केंद्रीय मंत्री व पीपल्स फॉर ॲनिमल्सच्या प्रमुख मनेका गांधी यांनी राज्याच्या वनविभागाला शहरात अवैध पोपटाच्या विक्रीवर बंदी घालण्याबद्दल सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरातील विविध भागांत पोपट विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. सूचीबद्ध प्राणी आणि पक्ष्यांना घरात पाळण्यापूर्वी वनविभागाची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, पोपट पाळण्यासाठी वनविभागाने परवानगी दिलेली नाही. पोपट हा पक्षी राष्ट्रीय संपत्ती असून त्याला मुक्त संचाराचा हक्क आहे. त्याचे आयुष्य पिंजऱ्यात बंद करणे हा कठोर गुन्हा असल्याने पोपटाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्यांविरुद्ध वनविभाग कठोर पावले उचलणार असल्याची आहे.

विदर्भ

नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

02.30 AM

नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांना हटविण्याची मागणी करण्यासाठी नागपुरातील...

12.30 AM

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017