पोलिस शिपायाचे फोडले डोके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नागपूर - घरगुती वाद सोडविण्यास गेलेल्या हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या पोलिस शिपायाच्या डोक्‍यावर एका युवकाने फायटरने हल्ला करीत डोके फोडले. याप्रकरणी पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना काल (ता. ५) सकाळी साडेनऊ वाजता घडली. 

नागपूर - घरगुती वाद सोडविण्यास गेलेल्या हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या पोलिस शिपायाच्या डोक्‍यावर एका युवकाने फायटरने हल्ला करीत डोके फोडले. याप्रकरणी पोलिस शिपायाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. ही घटना काल (ता. ५) सकाळी साडेनऊ वाजता घडली. 

राजेश्‍वर विठोबाजी गिरडकर असे जखमी शिपायाचे नाव आहे. नुकतेच वादग्रस्त पोलिस निरीक्षक सुनील झावरेंच्या वागणुकीमुळे हुडकेश्‍वर पोलिस ठाणे शहर पोलिस दलात चर्चेत आले आहे. त्यातही आता पोलिस शिपायावर हल्ला झाल्याने पुन्हा हुडकेश्‍वर ठाण्याची चर्चा सुरू झाली. सिद्धेश्‍वरी नगर, भेंडे आटा चक्‍कीजवळ एक युवक आई-वडिलांना शिवीगाळ करीत त्रस्त देत असल्याचा फोन हुडकेश्‍वर पोलिसांना आला. पोलिस शिपाई गिरडकर आणि प्रमोद इंगळे हे दोन्ही बिट मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रल्हाद नंदकिशोर चकोले (२६) याला ताब्यात घेऊन ताब्यात घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो युवक पोलिस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी देत होता. मद्यप्राशन करून असलेल्या राजेश्‍वरने खिशातील फायटरने पोलिस शिपाई गिरडकर यांच्यावर हल्ला केला. यात गिरडकर यांचे डोके व डोळ्यांना जखम झाली. त्यामुळे पोलिसांनी सीआर वाहनाला पाचारण केले आणि युवकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

दारूच्या पैशासाठी शिवीगाळ 
आरोपी प्रल्हाद चकोले दारूसाठी पैसे मागण्यासाठी आईवडिलांना नेहमीच शिवीगाळ करतो. यापूर्वी त्याच्यावर हुडकेश्‍वर पोलिसांनी कारवाईसुद्धा केली. प्रत्येक वेळी त्याच्यावर कारवाई करतेवेळी तो पोलिसांवर आरडाओरड करीत त्रस्त करून सोडत होता. मात्र, पालकांच्याच आग्रहाखातर लहान-सहान कारवाई करून सोडून देण्यात येत होते.

टॅग्स