राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपुरात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे उद्या, शुक्रवारी प्रथमच संत्रानगरीत आगमन होत आहे. या भेटीत ते दीक्षाभूमिला भेट देणार आहेत. याशिवाय ते रामटेक व कामठी येथेही जाणार असून सायंकाळी कवीवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. 

राष्ट्रपतींच्या दौऱ्याची गेल्या दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासन, महापालिका तयारी करीत आहे. राष्ट्रपतींचे उद्या सकाळी 10 वाजता भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करतील. यानंतर ते दीक्षाभूमिला भेट देतील. सायंकाळी ते रेशिमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण करणार आहे.