नागपुरमध्ये कारागृहात कैद्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

आयुष पुगलिया याची सुनियोजित हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. कारागृह प्रशासनावर आरोप करण्यात आला असून, हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे.

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात आज (सोमवार) सकाळी एका कैद्याची फरशी डोक्यात घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुश कटारिया हत्याकांडातील मुख्य आरोपी आयुष पुगलिया याची आज सकाळी कारागृहात हत्या करण्यात आली आहे. कैद्यांच्या दोन गटाच्या वादात हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे. आयुषच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या करण्यात आली. तो कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी होता. तो दुहेरी जन्मठेप सध्या भोगत होता. या हत्येमुळे पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आयुश पुगलिया याची सुनियोजित हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. कारागृह प्रशासनावर आरोप करण्यात आला असून, हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे.