‘ऑडिट’साठी पुण्याचे पथक

मनोरुग्णालयाचे प्रवेशव्‍दार.
मनोरुग्णालयाचे प्रवेशव्‍दार.

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी  येणाऱ्या मनोरुग्णांना औषध विक्रीतून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दोन महिन्यांपूर्वी घडले. या प्रकरणी चौकशी समितीने घोटाळा करणाऱ्या राजकुमार डोमळे या कर्मचाऱ्याला निलंबित केले. पोलिसांत गुन्हा नोंदवला. मनोरुग्णालयात ऑडिट करण्यासाठी गुरुवारी पुणे येथील पथक धडकले आहे. आतातरी या प्रकरणातील पूर्णसत्य बाहेर येईल काय? अशी चर्चा येथे होती.

मनोरुग्णालयात औषधोपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांना ४० रुपयांची औषधी ८० रुपयांना  विकत असल्याचे प्रकरण डोमळे या कर्मचाऱ्यांच्या केलेल्या एका चुकीमुळे पुढे आले होते. या प्रकरणात अडकलेल्या डोमळे या कर्मचाऱ्याने शक्कल लढवून औषध विक्रीला वरकमाईचे  साधन बनवले होते. ८० रुपये मनोरुग्णालयाच्या तिजोरीत न जाता केवळ ४० रुपयेच तो टाकीत होता. उर्वरित ४० रुपये हा कर्मचारी आपल्याजवळ ठेवत होता. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले. यानंतरही या कर्मचाऱ्याला त्याच जागेवर काम प्रशासनाने दिले.

यामुळे या प्रकरणात डोमळे नावाचा एकच कर्मचारी नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ‘सकाळ’ने औषध घोटाळ्यानंतर डोमळेच औषधीचे पैसे घेत असल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर मात्र त्याला त्या टेबलवरून हटविण्यात आले. विशेष असे की, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे काम खुद्द प्रशासकीय अधिकारी आणि लिपिकांना दिले. यामुळे प्रशासनाकडे संशयाची सुई जाते. मात्र, डोमळे याला निलंबित करून त्याच्या विरोधात अंतिम अहवाल देत मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला एकट्यालाच  गोवण्यात आले. 

एका मनोरुग्णाचा मृत्यू 
मोरेश्‍वर राहाटे या मनोरुग्णाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. आठवड्यातील हा तिसरा  मृत्यू आहे. मनोरुग्णालयात फिजिशियन असताना वारंवार मेडिकलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येते. महिला मनोरुग्णांसाठी स्त्री व प्रसूतीरोगतज्ज्ञ असताना वारंवार महिलांनाही मेडिकलचा रस्ता दाखवला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com