नागपूर जिल्ह्यात पावसाचा कहर; तीन तास विक्रमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

तीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात नागपुरात शंभर मिमीच्यावर पाऊस पडण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 28 जूनला 113 मिमी आणि 18 जुलैला 135 मिमी पाऊस झाला होता.

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

तीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात नागपुरात शंभर मिमीच्यावर पाऊस पडण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 28 जूनला 113 मिमी आणि 18 जुलैला 135 मिमी पाऊस झाला होता.

शहरातील अंबाझरी ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. आजही विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा देण्यात आला आहे. बाजारगाव येथून ९ किमी अंतरावरील देवळी गावाकडे पूलावर मध्यरात्री झालेल्या पावसामुळे भले मोठे झाड वाहून आले आणि मार्गात आडवे झाल्यामुळे गावकरी व शाळेतील मुलांना प्रवास करताना गैरसोय झाली.

Web Title: nagpur news rain in nagpur district