सुगंधित तांदूळ बनविणाऱ्या कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - साध्या तांदळावर रासायनिक प्रक्रिया करून सुगंधित बासमती तांदूळ बनविण्याचा गोरखधंदा शांतीनगरातील एका घरात सुरू होता. पोलिसांनी सोमवारी रात्री छापा घालून घरातून ९० क्‍विंटल तांदूळ जप्त केला. कल्पना कुंटलवार असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. छापा पडल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली.  

कल्पना कुंटलवार हिच्या घरात तांदळावर रासायनिक प्रक्रिया करून नवीन तांदूळ बनविण्याचा कारखाना सुरू होता. शांतीनगरचे पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता कल्पना हिच्या घरात छापा घातला. या येथे साध्या तांदळात केमिकल मिसळविण्यात येत होते. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या विशिष्ट पावडरमध्ये ते तांदूळ ठेवले जात होते. 

साध्या तांदळाला बासमती तांदळाचा सुगंध देण्यात येत होता. फूड ॲन्ड ड्रग्स अधिकाऱ्यांना आज पोलिसांनी बोलावले. त्यांनी तांदळाचे नमुने घेऊन लॅबमध्ये पाठविले.

टॅग्स