समृद्धी मार्गासाठी कोरियासोबत एसपीव्हीः मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नागपूर, पुणेसाठी सिंगापूरच्या विमानतळ कंपनीशी करार

नागपूरः समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपनी आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना 'ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) येथे सांगितले. या मार्गासाठी कुठेही विरोध नाही, लोकांना विश्‍वास घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा झेंडा दिला. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शुक्रवारी (ता. 29) कोरिया, सिंगापूर येथील दौरा आटोपून परतले. आज याबाबत त्यांनी पत्रकारांना सांगितले. कोरियाने तेथील सेऊल व भूचान या शहरात पाचशे किमीचा एक्‍स्प्रेस वे तयार केला. त्यामुळे या कंपन्यांनीही महाराष्ट्रात येऊन एसपीव्ही स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली. एवढेच नव्हे सिंगापूर येथील वित्त परिषदेसोबतही चर्चा झाली असून, ते महाराष्ट्रात गुंतवणुकीस तयार आहे. सिंगापूर येथील चांगी विमानतळ कंपनीशी नागपूर व पुणे विमानतळ विकासासाठी करार झाला. पुणे येथील विमानतळासाठी चांगी विमानतळाचे तंत्रज्ञ काम करतील व एसपीव्ही स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपुरातील नागपूर महानगर विकास प्राधीकरणाला एक-दोन दिवसांत मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फूट ओव्हर ब्रिज आता रेल्वे सेफ्टीमध्ये
रेल्वे खात्यात फुट ओव्हर ब्रिज हे पायाभूत सुविधांमध्ये होते. रेल्वे सुरक्षेच्या नियमात नव्हते. आता मात्र कालच्या घटनेनंतर फूट ओव्हर ब्रिजही रेल्वे सेफ्टीअंतर्गत अंतर्भूत करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तत्काळ घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: nagpur news SPV with Korea for the prosperity route: devendra fadnavis