स्वाइन फ्‍लूने दोघे दगावले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नागपूर - आरोग्यसेवेच्या नागपूर विभागात ‘स्वाइन फ्लू’ची बाधा झालेल्या  लागणग्रस्तांची संख्या चारशेवर पोचली आहे. सोमवारी पुन्हा स्वाइन फ्लूच्या बाधेने दोघे जण दगावले. मृतांचा आकडा आता ७९ वर पोचला आहे. शहरातील ३२ वर्षीय युवकाचा मृतात समावेश असून, श्‍यामनगर येथील रहिवासी आहे. दुसरा ५६ वर्षीय व्यक्ती अमरावती येथील असल्याची नोंद आरोग्य विभागाने नोंदवली. दोघांनाही नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला खासगी  रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये आणले. मेडिकलमध्ये ‘स्वाइन फ्लू’ असल्याचे निदान झाले.

नागपूर - आरोग्यसेवेच्या नागपूर विभागात ‘स्वाइन फ्लू’ची बाधा झालेल्या  लागणग्रस्तांची संख्या चारशेवर पोचली आहे. सोमवारी पुन्हा स्वाइन फ्लूच्या बाधेने दोघे जण दगावले. मृतांचा आकडा आता ७९ वर पोचला आहे. शहरातील ३२ वर्षीय युवकाचा मृतात समावेश असून, श्‍यामनगर येथील रहिवासी आहे. दुसरा ५६ वर्षीय व्यक्ती अमरावती येथील असल्याची नोंद आरोग्य विभागाने नोंदवली. दोघांनाही नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला खासगी  रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये आणले. मेडिकलमध्ये ‘स्वाइन फ्लू’ असल्याचे निदान झाले. मृतांतील ३४ रुग्ण हे केवळ नागपूर शहरातील आहेत.