उत्तर नागपुरात उद्या ठणठणाट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नागपूर - कन्हान येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला इंदोरा चौकात गळती लागली आहे. जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीची कामे मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून करण्यात येणार आहे. या कामासाठी 12 ते 14 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

कन्हान येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी गळतीमुळे वाहून जात आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे मंगळवारी केली जाणार आहेत. त्यामुळे इंदोरा जलकुंभ क्रमांक एकअंतर्गत येणाऱ्या मायानगर, चॉक्‍स कॉलनी, विद्यानगर, आंबेडकर कॉलनी, मॉडेल टाऊन इंदोरा, इंदोरा जलकुंभ क्रमांक दोनअंतर्गत येणाऱ्या बुद्धनगर, आशीनगर, अशोकनगर, सिद्धार्थनगर, टेका, सन्यालनगर, देवीनगर, बाबा बुद्धाजीनगर, हबीबनगर, फारुखनगर, नई बस्ती, मिलिंदनगर, गुरुनानकपुरा, ताजनगर, वैशालीनगर, कबाडी लाइन, बाळाभाऊपेठ, विदर्भ हाउसिंग सोसायटी, वाहनठिकाणा जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या कुरथकरपेठ, आंबेडकर कॉलनी, नवा नकाशा, लष्करीबाग, कश्‍मिरी गली, आवळेबाबू चौक, भोसलेवाडी, ज्योतीनगर, हरदासनगर, बोरियापुरा परिसरातील शोभाखेत, बारसेनगर या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असे ओसीडब्ल्यूने कळविले आहे. 

Web Title: nagpur news water