नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय उद्यापासून होणार रुजू 

अनिल कांबळे
मंगळवार, 31 जुलै 2018

नागपूर : नागपूरमध्ये अनेक वर्षे कार्य केलेले डॉ. भूषणकुमार उपाध्याय बुधवारी पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. नागपूरची खडान्‌खडा माहिती असल्याने त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
बिहार येथील डॉ. उपाध्याय यांची 1989 मध्ये भारतीय पोलिस सेवेत महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड झाली. पोलिस खात्यात आल्यानंतर त्यांनी कारकिर्दीला पंढरपूर येथून सहायक अधीक्षक म्हणून सुरुवात केली. उस्मानाबाद येथे अपर अधीक्षक, लातूर, जळगाव आणि चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी नागपूर ग्रामीणचे अधीक्षक म्हणून कार्य केले. 

2001 मध्ये नागपूर शहरात पोलिस उपायुक्त, त्यानंतर मध्यवर्ती कारागृहात कारागृह उपमहानिरीक्षक होते. या काळात त्यांनी गांधी विचारधारा परीक्षा, कैद्यांची गळाभेट, योगासने, साधनेच्या माध्यमातून कैद्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. नागपूरनंतर त्यांची सोलापूरचे आयुक्त म्हणून बदली झाली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून आस्थापना विभागात, सहपोलिस आयुक्त मुंबई वाहतूक, गृह मंत्रालयात प्रधान सचिव (विशेष) आणि अपर महासंचालक म्हणून काम केले. 

डॉ. उपाध्याय यांची यशस्वी कामगिरी लक्षात घेता सरकारने 2000 मध्ये विशेष सेवा पदक, 2005 मध्ये भारतीय पोलिस सेवेचे पदक, अंतर्गत सुरक्षा पदक, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, 2013 मध्ये राष्ट्रपतीचे पोलिस पदक आणि 2014 मध्ये उर्दू साहित्य अकादमीचा विशेष पुरस्कार दिला. डॉ. उपाध्याय यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत. त्यात माईंड मॅनेजमेंट, द ग्रेट माईंड मॅनेजर्स ऑफ द वर्ल्ड व महाभाष्य आणि ध्वनी विचार या पुस्तकांचा समावेश आहे. 

कैद्यांच्या हृदयात वसलेला अधिकारी 
डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे 2003 ते 2004 पर्यंत नागपूर मध्यवर्ती कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असताना कैद्यांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी भरघोस प्रयत्न केले. त्यामुळे कैद्यांना चविष्ट आणि सकस आहार मिळत होता. कारागृहात चांगले जेवण मिळत असल्याने कैदीदेखील आनंदात होते. त्याचप्रमाणे कारागृहात आवश्‍यक त्या सुधारणा केली. गळाभेट ही संकल्पना डॉ. उपाध्याय यांनीच कारागृहात राबविली. डॉ. उपाध्याय यांची बदली झाल्याचे वृत्त कारागृहात पसरले त्यावेळी कैद्यांनी बंड पुकारले होते. कैद्यांनी कारागृहातच उपोषण सुरू केले होते. तीन दिवस कैदी उपाशी होते. डॉ. उपाध्याय यांनी समजूत काढल्यानंतर कैदी शांत झाले होते.

Web Title: nagpur s new police commissioner joining from tomorrow