उन्हाचा प्रभाव कमी पारा 42.4 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नागपूर - विदर्भात उन्हाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. सोमवारीही नागपूरसह बहुतांश शहरांमध्ये पारा खाली आला. पुढील तीन-चार दिवस वातावरण कायम राहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आली. मार्चमध्ये कमाल तापमानाने विक्रमी उंची गाठल्यानंतर गेल्या तीन दिवसांत वातावरणात अनपेक्षित बदल झाला.

ढगाळ वातावरणामुळे पारा 43.3 अंशांवरून 42.4 अंशांपर्यंत खाली आला. चंद्रपूरच्या (41 अंश सेल्सिअस) तापमानातही तीन अंशांची घट झाली. अकोला, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यातही पारा किंचित घसरला. सोमवारी विदर्भात सर्वाधिक तापमान वर्धा येथे 42.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. उन्हाचे चटके कमी झाले असले, तरी उकाड्यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहिल्या. रात्रीपर्यंत उन्हाच्या झळा जाणवल्या. उन्हाच्या लाटेसाठी सध्या अनुकूल वातावरण नसल्यामुळे या आठवड्यात पारा 42 ते 43 अंशांदरम्यान राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: nagpur temperature