'धूप-छाव का खेल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

ऊन कमी झाल्याने कमाई मंदावली

ऊन कमी झाल्याने कमाई मंदावली
नागपूर - 'साब, दो दिनों से धूप-छाव का खेल चल रहा हैं. चिलचिलाती धूप से लोगो को थोडी राहत जरुर मिली, लेकीन हमारे धंदे पर भी असर हुआ हैं. धूप जादा रही तो धंदा अच्छा होता', या भावना फुटपाथवर लिंबूपाण्याचा व्यवसाय करणाऱ्या राकेश पटेलचे. ऊन कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, एक व्यावसायिक मात्र बदलत्या वातावरणाला आर्थिक फटका मानतो.

मूळ रिवाचा (मध्य प्रदेश) रहिवासी राकेश गेल्या पंधरा वर्षांपासून फुटपाथवर व्यवसाय करतो. यंदा मार्च-एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसू लागल्याने त्याची चांगली कमाई होऊ लागली होती. मात्र, दोन दिवसांपासून कमाईला किंचित ब्रेक लागलाय. ढगाळ वातावरणामुळे ग्राहक कमी झाल्याचे त्याने सांगितले. पण, उन्हाची लाट कोणत्याही क्षणी येण्याची शक्‍यता असल्याने पुन्हा कमाई वाढेल, अशी त्याला अपेक्षा आहे.

20 दिवसांनंतर पारा प्रथमच 40 अंशांवर
मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाच्या लाटेने घामाघुम झालेल्या नागपूरकरांना गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने चांगलाच दिलासा दिला. दोन दिवसांत जवळपास तीन अंशांनी घसरला. सोमवारी नोंदविण्यात आलेले 40.0 अंश सेल्सिअस तापमान गेल्या 20 दिवसांतील सर्वांत कमी ठरले. यापूर्वी 22 मार्चला पारा चाळिशीच्या खाली म्हणजेच 38.4 अंशांवर गेला होता. सध्याच उष्णलाटेसाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे तापमानात फारसा बदल होणार नसल्याची माहिती, प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: nagpur temperature decrease