दंत रुग्णालयात ‘कॅड-कॅम’ यंत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नागपूर - शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे कृत्रिम दंतशास्त्र विभागात ‘कॅड-कॅम’ (कॉम्प्युटर असिस्टेड डिझाइन व कॉम्प्युटर असिस्टेड मिलिंग) या अद्ययावत संयंत्राचे उद्‌घाटन शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

नागपूर - शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे कृत्रिम दंतशास्त्र विभागात ‘कॅड-कॅम’ (कॉम्प्युटर असिस्टेड डिझाइन व कॉम्प्युटर असिस्टेड मिलिंग) या अद्ययावत संयंत्राचे उद्‌घाटन शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश कोहाडे, उपविभागीय अभियंता प्रदीप तुंडुलवार, शाखा अभियंता नचिकेत वैरागडे, अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, विभागप्रमुख डॉ. सत्यम वानखडे, डॉ. सूर्यकांत देवगडे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृत्रिम दंतशास्त्र विभागात ‘कॅड-कॅम’ या अत्याधुनिक संयंत्रामुळे दंत रुग्णांना कृत्रिम दात अल्पावधीत प्राप्त करून दिले जाणार आहेत. गरजू रुग्णांना दंत चिकित्सेच्या दृष्टीने हे उपकरण अत्यंत उपयोगी ठरणार आहे. याशिवाय क्राऊन, ब्रीज, इम्प्लांट, लॅमिनेट या सुविधादेखील रुग्णांना प्राप्त होतील. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ‘कॅड-कॅम’ संयंत्रासाठी १ कोटी ५४ लाख ६७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. दिवसेंदिवस तंबाखू, खर्रा यांच्या व्यसनामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मेडिकल कॉलेजच्या अहवालानुसार सद्यस्थितीत दहा कॅन्सर रुग्णांपैकी आठ जणांना तोंडाचा कॅन्सर आढळतो. मौखिक कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असणारे ‘ऑटोमॅटिक स्लाइड्‌स ट्रेनर’ आणि क्रायोस्टॅट या उपकरणांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

शासकीय दंत महाविद्यालयाची श्रेणीवर्धन आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. ‘कॅड-कॅम’ संयंत्रामार्फत देण्यात येणाऱ्या रुग्णसेवेचे शुल्क खासगी दंत-तंत्र शाळांच्या दरांपेक्षा कमी आकारता यावे यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे प्रस्ताव सादर केला. 
-डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM