४० महाविद्यालयांच्या प्रवेशावर बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नागपूर विद्यापीठ - ‘एलईसी’ आणि संलग्नीकरण न केल्याने कारवाई

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ४० नव्या महाविद्यालयांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशावर विद्यापीठाने बंदी आणली आहे. या महाविद्यालयांनी स्थानिक चौकशी समिती (एलईसी) आणि संलग्नीकरण घेण्यास नकार दिला. यापूर्वीच विद्यापीठाने १०१ महाविद्यालयांनी संलग्नीकरण न घेतल्याने त्यांचे प्रवेश गोठविले. त्यामुळे आतापर्यंत विद्यापीठातील एकूण १५१ महाविद्यालयांचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत. 

साठहून अधिक महाविद्यालये बंद झाली. यात कला, वाणिज्य, विज्ञान, लायब्ररी सायन्स, शारीरिक शिक्षण, शिक्षण, अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमांची महाविद्यालये बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, विद्यापीठाकडून प्रत्येक महाविद्यालय दरवर्षी संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, या वर्षी १२२ महाविद्यालयांनी संलग्नीकरणासाठी अर्जच केला नव्हता. त्यांना १५ मेपर्यंत पुन्हा अर्ज करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर तीन महाविद्यालयांनी संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित १८ महाविद्यालयांनी स्वत:हून महाविद्यालय बंद करण्याचे पत्र दिले. त्यातूनच एकूण १०१  महाविद्यालयांचे प्रवेश गोठविण्यात आले; तर १८ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.  

दुसरीकडे संलग्नीकरणाप्रमाणेच ७४ महाविद्यालयांनी ‘एलईसी’ लावण्यास नकार दिला होता. विद्यापीठाकडून अल्टिमेटम मिळताच त्यापैकी बऱ्याच महाविद्यालयांनी स्थानिक चौकशी समिती (एलईसी) लावण्यास सुरुवात केली. मात्र, अल्टिमेटमनंतरही आठ महाविद्यालयांमध्ये स्थानिक चौकशी समिती (एलईसी) न लावण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळेच विद्यापीठाने त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्याचा निर्णय घेतला. केवळ कोंढा-कोसरा येथील डॉ. अरुण मोटघरे मास्टर ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाला एनसीटीईची सुधारित मान्यता नसल्याने त्याचे प्रवेश गोठविण्यात आले.

प्रक्रिया केल्यास घेता येणार प्रवेश
विद्यापीठाने महाविद्यालयांचे प्रवेश संलग्नीकरण आणि ‘एलईसी’ न लावल्याने गोठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे महाविद्यालय कायमचे बंद झाले असे म्हणता येणार नाही. पुढल्या वर्षी महाविद्यालयांनी संलग्नीकरण वा एलईसी लावल्यास त्यांना पुन्हा प्रवेशास मान्यता मिळणार आहे.