नागपूर जिल्ह्यात ४४ जणांना डेंगीचा डंख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

दहशत कायम - स्वाइन फ्लूचा प्रकोप, आरोग्य यंत्रणा ढिम्म 

नागपूर - नागपूर जिल्ह्यत स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरू आहे. मलेरियाने हातपाय पसरले असून जिल्ह्यात डेंगीची दहशत पसरली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात अवघ्या वीस दिवसांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. वीस दिवसांपूर्वी अवघे २४ डेंगीग्रस्त जिल्ह्यात होते. नागपूर जिल्ह्यात डेंगीच्या डासाने डेंगीग्रस्तांची संख्या ४४ झाली आहे.

दहशत कायम - स्वाइन फ्लूचा प्रकोप, आरोग्य यंत्रणा ढिम्म 

नागपूर - नागपूर जिल्ह्यत स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरू आहे. मलेरियाने हातपाय पसरले असून जिल्ह्यात डेंगीची दहशत पसरली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागात अवघ्या वीस दिवसांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. वीस दिवसांपूर्वी अवघे २४ डेंगीग्रस्त जिल्ह्यात होते. नागपूर जिल्ह्यात डेंगीच्या डासाने डेंगीग्रस्तांची संख्या ४४ झाली आहे.

महापालिकेच्या हद्दीतील २३ तर नागपूर ग्रामीण भागातील २१ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंगीचा डंख जिल्ह्याला गतीने विळख्यात घेत असताना आरोग्य यंत्रणा मात्र ढिम्म आहे. जानेवारी ते जून महिन्यात डेंगीचे अवघे बोटावर मोजण्याइतके रुग्ण होते. याच महिन्यात डेंगीग्रस्तांची संख्या वाढली आहे.  संसर्गरोगाच्या या दहशतीने आरोग्य विभागाची झोप मात्र उडाली आहे.

एडिस इजिप्ताय आणि एडिस अल्बोपिक्‍टस मादी डासांमुळे डेंगी पसरतो. हे डास मादी डासांच्या डंखाच्या माध्यमातून मानवी शरीरात पसरतात. हे डास दिवसा सक्रिय असल्यामुळे फारसे माहिती होत नाही. डेंगीच्या संसर्गाने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. विशेष असे की, हे डास स्वच्छ पाण्यात तयार होत असल्यामुळे महापालिकेने डासांची शोध मोहीम सुरू 
केली.

स्वाइन फ्लूचे मोठे आव्हान असून दर दिवसाला मृत्यू होत आहेत. विभागात ५६ मृत्यू झाले असून २५ मृत्यू शहरातील आहेत. महापालिका मात्र जनजागरणात अडकली आहे.

डेंगी वाढत आहे. डेंगीच्या डासाची उत्पत्ती रोखणे आपल्या हातात आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे घर आणि परिसर स्वच्छ ठेवला तरी ८० टक्के साथ आजारांना दूर ठेवता येते. ग्रामीण भागात ग्रामपंचायत सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने पुढाकार घेऊन ग्रामस्थांना डेंगीपासून तर स्वाइन फ्लूसारख्या साथ आजारापासून बचाव करण्यासंदर्भात जनजागरण करावे. 
- डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, आरोग्य विभाग (हिवताप), नागपूर.

डासअळ्यांसाठी दंड
महापालिकेतफे डेंगी निर्मूलनासाठी मोहीम सुरू आहे. डास अळ्या शोधण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे. पथक लावले आहेत. परंतु या पथकांकडून डासअळ्या दिसल्या की, दंड ठोठावला जातो. डासअळ्या निर्मूलनासाठी तत्काळ कारवाई करून घेण्याची गरज आहे. शहरातील शाळांमध्ये डासअळ्या सापडल्या. अळ्या दिसल्या की, नोटीस बजावतात. पुढे काही होत नाही.

खासगीत लूट 
डेंगीच्या रुग्णांसाठी रॅपिड चाचणी करून रुग्णाला डेंगी असल्याचे थेट खासगीत सांगण्यात येते. मात्र खासगीतून तपासणीसाठी आरोग्य विभागाकडे आलेले ८० टक्के नमुने डेंगीचे नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे डेंगीच्या नावावर खासगी रुग्णालयांमध्ये प्रचंड लूट सुरू आहे. याशिवाय केंद्र शासनाने डेंगी नोटीफाईड आजार म्हणून नोंदी ठेवण्याची सक्ती असतानाही खासगीकडून सार्वजनिक आरोग्य विभागात नोंदी होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: nagpur vidarbha news 44 dengue patient