मुख्यमंत्र्यांमुळेच अर्बन मोबिलिटी एक्‍स्पो नागपुरात - ब्रजेश दीक्षित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नागपूर - पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये नागपुरात अर्बन मोबिलिटी एक्‍स्पो होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच संत्रानगरीला आयोजनाची संधी मिळाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी आज स्पष्ट केले. यानिमित्त देश-विदेशातील बदलते वाहतूक व्यवस्थापन, मेट्रो रेल्वे, बस वाहतुकीचे तंत्रज्ञान नागपुरात पोहोचणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

हैदराबाद येथील अर्बन मोबिलिटी इंडिया एक्‍स्पोमध्ये महामेट्रोच्या स्टॉलला अव्वल क्रमांक मिळाला. महामेट्रोच्या या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी डेपोत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रकल्प संचालक महेशकुमार, रोलिंग स्टॉकचे सुनील माथूर, वित्त संचालक एस. सिवामाथन, महाव्यवस्थापक प्रशासन अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांसह इतर अधिकारी उपस्थित होते. अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या महामेट्रोने पहिला पुरस्कार  पटकाविल्याने सर्व अधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे पुढील वर्षी नागपुरात हा एक्‍स्पो होणार आहे. या एक्‍स्पोमध्ये देशातील तसेच विदेशातील मेट्रो प्रकल्प, वित्त संस्था, विदेशातील तंत्रज्ञ, सल्लागार कंपन्या नागपुरात येतील. मेट्रोचे नव्हे तर शहरी वाहतुकीशी संबंधित बस आदीबाबत येथे माहिती उपलब्ध होणार असल्याचेही दीक्षित यांनी सांगितले.

चीनवरून पुढील वर्षी येणार डबे
नागपूर मेट्रो रेल्वेची निर्मिती चीनमध्ये होत आहे. यासाठी येथूनही अधिकारी चीनला गेले आहेत. पुढील वर्षी जूनमध्ये चीनमधून नागपूर मेट्रोचे डबे येतील, असेही त्यांनी सांगितले.

क्रेजी कॅसलच्या थोड्या जागेची गरज 
रेल्वेसाठी क्रेजी कॅसलच्या केवळ एक तृतीयांश जमिनीची गरज आहे. ज्या जागेचा पार्किंगसाठी वापर होत आहे, तीच जागा गरजेचे आहे. क्रेजी कॅसलला दुसरी जागा तेथे उपलब्ध करून दिल्या जाईल. क्रेजी कॅसलही मेट्रोसाठी आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले.