विदर्भात भाजपची यशाची कमान कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

नागपूर - अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली.

नागपूर - अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली.

नागभीड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसचे नारायण रंदये यांचा पराभव केला. प्रभागांच्या निवडणुकीत मात्र भाजपला मोठे यश मिळविता आले नाही. एकूण 17 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे नऊ तर कॉंग्रेसचे सात सदस्य निवडून आले आहेत. एका अपक्ष सदस्यांनी विजय मिळविला आहे.

आदिवासीबहुल असलेल्या व कुपोषणामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या धारणी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने भगवा फडकाविला आहे. या पंचायत समितीच्या 10 पैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने धारणी पंचायत समिती कॉंग्रेसमुक्त झाली आहे.