चंद्रपूर 47.2 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - दोन-तीन दिवस उन्हाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बुधवारी पुन्हा विदर्भात उन्हाची तीव्र लाट आली. चंद्रपुरात कमाल तापमानाने या मोसमातील नवा उच्चांक गाठला. बुधवारी चंद्रपूर येथील कमाल तपमान 47.2 अंश होते. नागपुरातही पारा 45.3 अंशांवर गेला. सर्वाधिक उन्हासाठी प्रसिद्‌ध असलेला नवतपा उद्या, गुरुवारपासून सुरू होत असल्यामुळे उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. ब्रह्मपुरी येथेही कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. उन्हाच्या चटक्‍यांसोबतच दिवसभर उकाडा प्रचंड जाणवला.

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये - नागपूर 45.3, अकोला 45.0, अमरावती 42.8, ब्रह्मपुरी 46.0 चंद्रपूर 47.2, गोंदिया 44.5, वर्धा 45.5, यवतमाळ 43.8.