स्वदेशीला पसंती, चिनी वस्तूला नकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - दहा दिवसांवर दिवाळी आल्याने पणत्या, कंदील, रंगीत दिव्यांच्या माळा विकत घेण्याची बाजारात लगबग सुरू झाली आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंचे बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीत नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. यावर्षी मात्र, चिनी बनावटीच्या वस्तूंच्या खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी व्यक्त केली. 

फटाके, रांगोळी, रंगीत दिव्यांच्या माळांना दिवाळीला ग्राहकांची अधिक पसंती असते. परंतु, स्वदेशी आणि चीन भारतीय हद्दीत आणि सीमेवर तणाव निर्माण करीत आहे. तसेच पाकिस्तानला मदत करण्यासाठी सरसावल्याने देशभक्तीच्या भावनेमुळे ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीकडे कल आहे. गेल्या वर्षी या वस्तूंच्या खरेदीत २० टक्‍क्‍यांनी घट झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही यंदा चिनी वस्तूंची खरेदी कमी केली आहे. शहरातील अनेक दुकांनावर चिनी वस्तूंची विक्री होत नसल्याचे फलक लावले आहेत. 

दिवाळीसाठी बाजारपेठांमध्ये चिनी मालाऐवजी स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हा बदल यंदा अधिक प्रमाणात दिसत आहे.  गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान अंदाजे साडेसहा हजार कोटी रुपयांचा चिनी बनावटीचा माल विकला गेला होता. त्यात ‘मेड इन चायना’ माळा, फटाके, डेकोरशेनचे सामान, खेळणी यांसारख्या वस्तूंची सुमारे चार हजार कोटी रुपयांची विक्री झाली होती. ती विक्री यंदा अडीच हजार  कोटींवरच येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

चिनी मोबाईल कंपन्यांकडेही पाठ!
दिवाळीत सर्वाधिक विक्री होणाऱ्या रंगीत दिव्यांच्या माळांच्या खरेदीवर घट दिसून येणार आहे. तसेच चिनी बनावटीच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन्स, एलसीडी टीव्ही यांच्या खरेदीत घट झाल्याची माहिती असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी दिली आहे.

Web Title: nagpur vidarbha news chin goods oppose