नागपूर विमानतळाजवळील हॉटेलमध्ये युवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नागपूर - वर्धा मार्गावर नागपूर विमानतळाजवळच्या हॉटेल प्राइडमध्ये अलका प्रभाकर वळुंज (वय 25, रा. खारघर, नवी मुंबई) या युवतीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नागपूर - वर्धा मार्गावर नागपूर विमानतळाजवळच्या हॉटेल प्राइडमध्ये अलका प्रभाकर वळुंज (वय 25, रा. खारघर, नवी मुंबई) या युवतीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नेस्ले कंपनीत अलका वरिष्ठ पदावर कार्यरत होती. कंपनीच्या कामासाठी मंगळवारी (ता. 13) सकाळी ती मुंबईवरून नागपूरला आली.

हॉटेल प्राइडमध्ये ती वास्तव्यास होती. दिवसभर काम केल्यानंतर ती रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये परतली. अलकाच्या आई-वडिलांनी काल रात्री आणि आज सकाळी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तिने फोन उचलला नाही. यानंतर तिचा भावी पती संकेत विचारे याच्याही फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालकांनी हॉटेल व्यवस्थापनास कळविले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला; पण प्रतिसाद मिळत नसल्याने स्वाइप कार्ड वापरून दरवाजा उघडला. आत अलका पलंगावर पडलेली होती. तिच्या तोंडाला फेस आल्याचे दिसले. सोनेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर त्यांना अलका मृत अवस्थेत आढळळी.

अलका व संकेत विचारे यांचा काही दिवसांतच त्यांचा विवाह होणार होता. विवाहानंतर दोघेही अमेरिकेत राहायला जाणार होते.

विदर्भ

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील 1420 गावात शासकिय पाणी पुरवठा योजेनत दोन हजार कोटिंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बुलडाणा जिल्हा...

05.27 PM

राज्य उपाध्यक्षपदी अभियंता प्रज्ञा नरवाडे यांची नियुक्ती यवतमाळ : अखिल भारतीय विमुक्त व भटक्या जातीजमाती वेलफेअर फेडरेशनच्या...

04.39 PM

नागपूर - मराठी विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नसल्याने ते सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात, असा...

12.18 PM