'जिजामाता विद्वत गौरव' डॉ. देखणे यांना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - नागपूरच्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा "जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार' यंदा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांना जाहीर झाला आहे.

नागपूर - नागपूरच्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा "जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार' यंदा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांना जाहीर झाला आहे.

शिवराज्याभिषेक स्मृतीप्रसंगी धर्म, संस्कृती, इतिहास या क्षेत्रांमध्ये मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदा 36 वे वर्ष आहे. येत्या शनिवारी (3 जून) पुण्यात पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ स्थापत्य, तसेच मूर्तिकला अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर अध्यक्षस्थानी राहतील. वेदांती प्रवचनकार मंदा गंधे, समर्थभक्त सुनील चिंचोलकर आणि शिवकथाकार विजयराव देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख यांनी कळविले आहे.