अल्प मनुष्यबळात गुडघा प्रत्यारोपण

केवल जीवनतारे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - सोमवारीपेठेतील राज्य कामगार रुग्णालय गेल्या दोन दशकांपासून अतिशय बिकट अवस्थेतून प्रवास करीत आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने दोन वॉर्ड बंद आहेत. अशा दयनीय अवस्थेत असलेल्या कामगार योजना रुग्णालय आहे. येथे सध्‍या महिला राज सुरू असून उपलब्ध मनुष्यबळाच्या सहकार्यातून २ हिप जाइंट आणि ३ गुडघा प्रत्यारोपण करण्यात येथील डॉक्‍टरांना यश आले आहे. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत, हे विशेष. मोतिबिंदूची शस्त्रक्रिया होत नसलेल्या कामगार रुग्णालयात ‘गुडघा’ आणि ‘हिप’ प्रत्यारोपण होणे ही एकप्रकारची क्रांती होय. 

सोमवारीपेठेतील राज्य कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख आहेत. प्रशासकीय अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. जी. एस. धवड यांच्याकडे आहे. तर निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. बी. ए. चौधरी कार्यरत आहेत. तिन्ही महिला डॉक्‍टरांनी कामगार रुग्णालयाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती आहे. 

अंतराळापासून सैन्यदलापर्यंत विविध करिअर क्षेत्रात महिलांचा वरचष्मा निर्माण झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर नारीशक्तीचा एकमुखी ठसा उमटला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये दिसणाऱ्या डॉक्‍टरांच्या एकूण संख्येत निम्म्यापेक्षा जास्त महिला डॉक्‍टर दिसतात. कामगार
 रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. सुसज्ज असा अतिदक्षता विभाग नाही एकूणच इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीत हे रुग्णालय आजही उपेक्षित आहे. साधे सोनोग्राफी यंत्र नाही. परंतु येथील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांकडून गुडघा प्रत्यारोपण आणि हिप जाइंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर मात्र येथील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी तिन्ही अधिकारी महिलांना मदत करण्याचे काम सुरू केले. त्यांच्या व्यवस्थापनाला बळ देण्याचा प्रयत्न सारे दिलाने करीत आहेत. डॉ. देशमुख, डॉ. धवड आणि डॉ. चौधरी या महिलांनी कामगार रुग्णालयातील प्रत्येक विभागातील संबंधित डॉक्‍टरशी संवाद साधून क्‍लिनिकल आणि प्रशासना यांच्या सहकार्यातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या रुग्णांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

सीआर्म हवे आहे - डॉ. देशमुख
येथील अस्थिव्यंगोपचार विभागाला अद्ययावत करण्याचा प्रयत्न आहे. कामगार रुग्णालयात जोखमीचे काम खेळीमेळीच्या वातावरणात होत आहे. सद्या सी-आर्म, सोनोग्राफी यंत्राचा प्रस्ताव सादर केला आहे. कामगार रुग्णालयाच्या कामात सूत्रबद्धता आणण्यासाठी आठवड्याचा टाईमटेबल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कामकाज सुरू असून वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलाचा अवघ्या दोन महिन्यांत ३४ लाखांपेक्षा अधिक रकमेचा परतावा देणारे एकमेव कामगार रुग्णालय आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांनी सांगितले.