पालिकेचा मालमत्ता जप्तीचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - अनेक वर्षांपासून थकीत रकमेचा भरणा टाळणाऱ्यांना महापालिकेने मालमत्ता जप्त करण्याच्या धडाका सुरू केला. जप्तीनंतरही कराचा भरणा न केल्यास लिलावाचीही तयारी प्रशासनाने सुरू केली. मंगळवारी झोनमध्ये २६ मालमत्ता जप्त करण्यात आल्याने थकबाकीदारांत खळबळ माजली आहे. 

अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेने अनेकदा अभय योजना सुरू केली. आताही ही योजना सुरू आहे. मात्र, झोन कार्यालयांनी कुठल्याही नोटीस, योजनेचा परिणाम न होणाऱ्या थकबाकीदारांची यादी तयार केली. या यादीतील थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. 

आज मंगळवारी झोनने २६ मालमत्ता जप्त केल्या. यात नरेंद्रकुमार राठी यांच्या मालकीच्या सहा मालमत्ता असून त्यांच्यावर २ लाख ४४ हजार रुपये थकीत आहे. त्यांनी मागील पाच वर्षांपासून मालमत्ता कर जमा केला नाही. याशिवाय बंधू गृहनिर्माण संस्थेचे दोन मालमत्ता, जयदुर्गा गृहनिर्माण, मा बम्लेश्‍वरी गृहनिर्माणच्या प्रत्येकी एका मालमत्तेचा जप्तीत समावेश आहे. 
आर. सी. लॉन, निर्मल लॉन यांच्यासह अनेकांची मालमत्ता जप्त केली. याशिवाय श्रम दीप प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक कार्यालयाची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कार्यालयाकडे १ लाख ४७ हजार रुपये थकीत आहे. काल, गांधीबाग झोननेही सात मालमत्ता जप्त केल्या. यात शिवमंदिर पंचकमिटीच्या मालमत्तेचा समावेश आहे.