सातव्या आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

वाघ शिकार प्रकरण - २७ जुलैपर्यंत वनकोठडी 

नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने  महिन्याभरापूर्वी अटक केली होती. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपींपैकी एकाने सोमवारी वनविभागाकडे शरणागती पत्कारली. त्याला २७ जुलैपर्यंत  वनकोठडी सुनावण्यात आली. 

यापूर्वी अटक केलेल्या सहाही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यातील काही शिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत होता. त्यातील एस. एस. उईके (३२,  कोलितमारा (ता. पारशिवनी) याने स्वतः वनविभागाकडे शरणागती पत्कारल्यानंतर न्यायालयाने २७ जुलैपर्यंत वनकोठडी दिली. पेंच व्याघ्रप्रकल्पात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून अवैध मासेमारी बंद करण्यात वन्यजीव विभागाला यश आले नाही. उलटपक्षी जलाशयावर मासेमारी करणे हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही कधीच सोडणार नाही, अशी मासेमारांची भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर वन्यजीव विभागाचे अधिकारी व मासेमार यांच्यात वाद व्हायचा. 

या प्रकल्पाअंतर्गत कुठेही शिकारीची घटना घडली तर यात हमखास मासेमारांचाच हात असणार, हे गृहीत ठरवून वनाधिकारी तपास करतात. या घटनेत शिकार झालेल्या वाघाचे दात, नखे, विक्री करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या देवीदास तुकाराम कुमरे व बाबूलाल कुमरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून १३ ते १४ किलो वाघाची हाडे व वाघनखे जप्त करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पाच जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वनविभाग मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.