फाडफाड इंग्रजी बोलणार विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर - मराठी विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नसल्याने ते सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात, असा न्यूनगंड जवळपास प्रत्येक पालकामध्ये आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सतत घटत आहे. त्यामुळे विद्या प्राधिकारिणीतर्फे (एससीईआरटी) विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी बोलता यावे, यासाठी ‘कन्टिन्यूअस हेल्प टू टीचर्स ऑफ इंग्लिश फ्रॉम सेकंडरी स्कूल’ (चेस) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आठवड्यातील प्रत्येक शनिवारी शाळेत ‘इंग्लिश डे’ साजरा करण्यात येईल. विशेष म्हणजे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

मराठी शाळांमधील पटसंख्या सतत रोडावत आहे. याचे मुख्य कारण पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल होय. गरिबाच्या मुलालाही आरटीईअंतर्गत इंग्रजी शाळाच हवी असल्याने मराठी शाळांमध्ये विद्यार्थी दिसत नाहीत. दुसरीकडे मराठी शाळांमध्ये इंग्लिश कल्चरचा अभाव  असल्याने पालकांचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यातूनच विद्या प्राधिकारिणीतर्फे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाअंतर्गत मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ज्ञान मिळावे यासाठी ‘कन्टीन्यूअस हेल्प टू टीचर्स ऑफ इंग्लिश फ्रॉम सेकंडरी स्कूल’ (चेस) हा उपक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी राज्यातील आंग्लभाषा विभागाची मदत घेण्यात येईल.  

या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेत आठवड्यातील प्रत्येक शनिवार ‘इंग्लिश डे’ राहणार आहे. विशेषत: नववी, दहावीच्या शिक्षकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येईल. राज्यभरातील पंधरा हजारांहून अधिक इंग्रजी  विषयाच्या शिक्षकांना येत्या २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण देण्यात येईल. यात नागपूरसह औरंगाबाद, पुणे आणि नाशिक या ठिकाणांचा प्रशिक्षण केंद्रात समावेश केला आहे. शिक्षकांचा व्यावसायिक विकास करणे, देशात, राज्यात आपल्या विषयात काय सुरू आहे हे सांगणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे, शिक्षकांनी टेक्‍नोसॅव्ही होणे हा यामागील हेतू आहे.

असे असेल प्रशिक्षण
मराठी माध्यमातील शिक्षक आणि विद्यार्थी विकासाच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. तालुका स्तरावरदेखील तज्ज्ञ तयार करण्यात येणार आहेत. यात विद्यार्थ्यांना काय आणि कसे शिकवायचे, नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पद्धतीत काय बदल करायचे, दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांचे स्वत:ची भाषिक कौशल्यक्षमता विकसित करणे, हेल्प ॲट हॅण्डअंतर्गत वर्ग नियंत्रण, टेक्‍नोसॅव्ही करणे, शिक्षकांचा व्यावसायिक विकास करणे, शिक्षकांना एकमेकांसोबत जोडणे  आदी प्रशिक्षणाचा भाग राहणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news student english speaking