सुरेवाणी नाइट सफारीचे बुकिंग ऑफ लाइन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पांतील सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्राच्या बफर झोनमध्ये सुरू करण्यात आलेल्या नाईट पॅट्रोलिंग सफारीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १५ ऑक्‍टोबरपासून ही सुविधा सुरू झाली असून आतापर्यंत ६० पेक्षा अधिक पर्यटकांनी या पर्यटनाचा आनंद लुटला. या पर्यटनासाठी ऑनलाइन नव्हे, तर ऑफलाइन बुकिंगची सोय आहे. व्यक्तींची माहिती घेऊनच त्याला प्रवेश दिला जात आहे. 

नागपूरपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्रात नाईट पेट्रोलिंगची सुविधा सुरू केली. सुरेवाणी परिसरातील १३८ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ४० किलोमीटर परिसरात नाईट सफारीचे व्यवस्था आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, गवे, सांबर, चितळ, रानडुक्कर, चांदी अस्वल, खवल्या मांजर आदी वन्यप्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी आहे. सफारीला सुरेवाणीपासून सुरुवात होऊन महारकुंड तलाव, वाघझिरा, तसेच मध्य प्रदेशच्या वनसीमेपासून परत सुरेवाणी येथे ही सफारी समाप्त केली जात आहे. आतापर्यंत १३ ते १४ वाहनांतून पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. या सफारीची ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध नसून पेंच व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक कार्यालय अथवा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे नोंदणी केल्यानंतरच हा पर्यटनाचा आनंद लुटता येतो. मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, सहायक वनसंरक्षक शतानिक भागवत, नागलवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. सफारीसाठी दरदिवशी केवळ तीन जिप्सी किंवा एसयूव्ही वाहनांनाच परवानगी दिलेली आहे.

सुरेवाणीतील नाईट पॅट्रोलिंग सफारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सफारी सुरू करून दोन वर्षे झाली असून काही निर्बंध लावले आहेत. ऑनलाईन बुकिंगची सुविधा नसल्याने प्रत्यक्ष कार्यालय अथवा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या सफारीचा आनंद लुटता येणार आहे.  
- ऋषिकेश रंजन, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प

Web Title: nagpur vidarbha news surewani night safari booking oofline