आणखी दोन आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नागपूर - अंबाझरीतील संजयनगर ट्रस्ट ले-आउट परिसरात एका बारावी नापास युवकाने समांतर जिल्हाधिकारी कार्यालय उघडले होते. या कार्यालयावर गुन्हे शाखेने छापा घालून मास्टरमाइंड  नितीन ईश्‍वर वासनिक (देवलापार)ला अटक केली होती. या प्रकरणात आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून ७२ बनावट रबरी स्टॅम्प आणि ७४ प्रकारची बनावट प्रमाणपत्रे मिळाली. आशीष गोपाल खरे (वय २०, रा. संजयनगर, पांढराबोडी) आणि किरण लक्ष्मण रोडगे (३०, एकात्मतानगर, जयताळा) अशी बुधवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

आशीष आणि किरण हे दोघे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील दलालांचे ‘बॉस’ आहेत. ते प्रमाणपत्रांची कामे घेऊन नितीनकडे आणून देत होते. विद्यापीठ, पोलिस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी, नगरसेवक, सरपंच, उपजिल्हाधिकारी या सर्व कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे बनावट रबरी शिक्‍के नितीनने तयार केले होते. केवळ १० मिनिटांत नितीन कोणतेही प्रमाणपत्र तयार करून देत होता. अशाप्रकारे ७४ प्रकारची प्रमाणपत्रे तो १० मिनिटांत देत होता. ज्या व्यक्‍तीला सायकल चालविता येत नाही, त्या व्यक्‍तीला ट्रकचे ड्रायव्हिंग लायसन १० मिनिटांत तयार करून देण्यात येत होते.

कलेक्‍टर ते कमिश्‍नरपर्यंत हुबेहूब सही
बाराव्या वर्गात नापास झाल्यानंतर कामाच्या शोधात आलेला नितीन वासनिक डोकेबाज आहे. तो जिल्हाधिकारी ते पोलिस आयुक्‍तापर्यंतच्या सह्या हुबेहूब करू शकतो. त्याला कुणाचेही हस्ताक्षर काढता येते. प्रमाणपत्रांवर अनेकांचे शेरेसुद्धा तो अधिकाऱ्याच्या हुबेहूब हस्ताक्षरात लिहितो,  अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी वाढविण्याची शक्‍यता
नितीन एकटा एवढे मोठे समांतर जिल्हाधिकारी कार्यालय चालवू शकत नाही. त्याच्या  गोरखधंद्यात काही मोठमोठे दलाल ते शासकीय कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: nagpur vidarbha news two accused arrested