नारायण राणे शहरात कोणाच्या भेटीला?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करून उद्या शुक्रवारपासून नागपूर येथून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. उद्या ते कोणाला भेटण्यासाठी नागपूरला येत याची राजकीय वतुर्ळाला प्रचंड उत्सुकता लागली आहे. आमदार नीतेश राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप दौरा निश्‍चित नसल्याचे सांगितले. 

विशेष म्हणजे उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद नागपूरमध्ये आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते व मंत्री शहरात आहेत. यापैकी एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावून नारायण राणे काँग्रेसला जोरदार धक्का देतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहे. दुसरीकडे अद्याप त्यांनी भाजपात  प्रवेश केला नसल्याचे याची शक्‍यता कमीच असल्याचेही बोलल्या जात आहे. राणे यांचे राज्यभर समर्थक आहेत. यामुळे आपली बाजू भक्कम करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेठीगाठी घेऊन त्यांना सोबत घेतील अशीही चर्चा आहे. अलीकडे मुत्तेमवार-चतुर्वेदी यांच्या गटात प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना हटविण्याचीसुद्धा मागणी चतुर्वेदी गटातर्फे केली जात आहे. मात्र, ते राणे यांच्यासोबत पक्ष सोडून जातील याची कुठलीही शक्‍यता सध्या दिसत नाही. 
नारायण राणे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी राणे यांचे पटले नाही. आदर्श घोटाळ्याचे प्रकरण बाहेर निघाल्यानंतर राणे यांना आपल्याला मुख्यमंत्री केले जाईल असे वाटत होते. मात्र, चव्हाण यांना हटवून काँग्रेसने दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले. यामुळे राणे चांगलेच संतापले होते. पक्ष सोडण्याची धमकीसुद्धा दिली होती. यानंतर त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देऊन शांत बसविण्यात आले होते. मुख्यमंत्री सोडाच प्रदेशाध्यक्षपदीसुद्धा नियुक्ती करण्यात आली नसल्याने राणे यांनी पुन्हा बंडाचे निशाण फडकावले. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान राहुल गांधी यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यातही ते फिरकले नव्हते. आज त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली.