बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जगण्याची इच्छा संपल्याचे ‘सुसाईड नोट’मध्ये नमुद
12th student commits suicide suicide note states that the desire to live is over nagpur
12th student commits suicide suicide note states that the desire to live is over nagpursakal

नागपूर : बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांने ‘माझी जगण्याची इच्छा संपलेली आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, अशी सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. आदित्य मधुकर मोवाडे (वय १७ रा. साईनगर, गोधनी रोड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य बारावीचा विद्यार्थी होता आणि जेईईची तयारी करीत होता. त्याचे आई-वडील खासगी संस्थेत काम करतात. मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मंगळवारी दुपारी आदित्यने अचानक राहते घरी खिडकीला दोरी बांधून गळफास लावला.

सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आई घरी परतली असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. मुलाला या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला. तिची आरडा-ओरड ऐकून शेजारी गोळा झाले. आदित्यला तत्काळ खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुसाईड नोटवरुन त्याच्या मनात अनेक दिवसांपासून आत्महत्येचा विचार सुरू होता, असे दिसून येते. त्यामुळे तो कुठल्यातरी तणावात होता. मात्र, त्याचे कारण अद्याप होऊ शकले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली असूनन तपास सुरू केला आहे.

मोबाईलमध्ये लिहिली सुसाईड नोट

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. आदित्यजवळही पोलिसांना सुसाईड नोट वगैरे काहीही मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मोबाईल फोन तपासण्यात आला. आदित्यने आपल्या मोबाईल फोनमध्येच सुसाईट नोट लिहून ठेवलेली होती.

दहावीतच आला होता आत्महत्येचा विचार

आदित्यने मोबाईलमध्ये टाईप केलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘आता माझी जगण्याची इच्छा संपलेली आहे. मला मरायचे आहे. दहावीनंतरच माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत होता, मात्र, मी आता आपला जीव देत आहे.’ खिडकीला दोरी बांधणे आणि गळफास बनविण्याची वेळही त्याने नोटमध्ये नमूद केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com