नागपूर : शुल्क थकले तरी शिक्षण थांबवू नका

शिक्षणाधिकाऱ्यांचे इंग्रजी शाळांना निर्देश
Admission Fee
Admission FeeSakal

नागपूर : स्वयंअर्थसाहाय्य अर्थात इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क थकीत असले तरी शिक्षण थांबविता येणार नाही. तसेच टीसी व शुल्कासाठी पालकांना त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना या शाळांना शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिल्या आहेत. याविषयीच्या तक्रारी आल्यास विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यान्वये कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडे शैक्षणिक शुल्क थकित असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग बंद करणे,टीसी न देणे व शुल्क मागण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्रास देणे, हेतुपुरस्सर निकाल अडवणे अशा प्रकारांत वाढ झाली होती.

याबाबत असंख्य तक्रारी शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत्या. पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास शिक्षण विभाग कमी पडत असल्याचाही आरोप होत होता. त्यानंतर वारंवार निर्देश देऊनही या शाळा शिक्षण विभागाचा आदेश मान्य करायला तयार नसल्याची बाब उघडकीस आली. यासंदर्भात इंग्रजी शाळांच्या व्यवस्थापन प्रमुखांची बैठक घेऊन त्यामध्ये कायद्याचा दाखला देत शासनाच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com