मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी अन् खुर्च्यांची फेकाफेक

मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी अन् खुर्च्यांची फेकाफेक

नांदुरा (जि. बुलडाणा) - बळिराजा जलसंजीवनी योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आज (ता. १७) नांदुऱ्यात आले असताना त्यांच्या सभेत प्रचंड घोषणाबाजी अाणि खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. यामुळे सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

ही सभा दुपारी सव्वा वाजता सुरू झाली. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, अशी मागणी करत सभास्थळाबाहेर घोषणाबाजी सुरू केली. जळगाव जामोद येथील संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते सभेत पोचले होते. त्यांनी सभा सुरू होताच मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. सभा संपताच पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करीत पांगवले. सभास्थळाबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

दुसरीकडे नागरिकांची गर्दी वाढत होती. बसायला जागा नसल्यामुळे नागरिकांनी खुर्च्यांची फेकाफेक केल्याचे सांगण्यात आले.

तत्पूर्वी, कोळी जातीचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. मुख्यमंत्री शहरात दाखल होण्यापूर्वी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. पोलिसांनी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन खामगावला हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com