नवजात शिशूंचा चटके दिल्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

अमरावती : आदिवासी बहुल भागात अद्यापही अंधश्रद्धा कायम आहेत. आजार बरा करण्यासाठी नवजात शिशूंना चटके दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात मृत्यू झाल्याने हे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. रविवारी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

जन्मल्यानंतर चिखलदरा तालुक्‍यातील काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी उपचाराकरता दोन शिशूंना दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. कमी वजन आणि जंतुसंसर्ग यासोबतच दोन्ही शिशूंच्या पोटावर चटक्‍यासारखे व्रण होते. रुग्णालयाने पोलिसांना याबबाबतची माहिती दिली.

ही बालके कमी वजनाची होती; परंतु दोन्ही नवजात शिशूंच्या शरीरावर आढळून आलेले चटके कुणी आणि कशासाठी दिले, यासंदर्भात ठोस माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. मात्र, अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

Web Title: new born infant dies of torture