राज्यातील नऊ संस्थांमध्ये ५,१९४ कुष्ठरोगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अमरावती - राज्यात पुनर्वसन तत्त्वावर कार्यरत नऊ संस्थांमध्ये ५,१९४ कुष्ठरुग्णांची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे महारोगी सेवा समिती आनंदवनात  आहेत. येथे साडेतीन हजारांहून अधिक कुष्ठरुग्णांची नोंद आहे. शासनातर्फे २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरिता प्रतिरुग्ण दोन रुपये दरमहा अनुदान देण्यात येत आहे.

अमरावती - राज्यात पुनर्वसन तत्त्वावर कार्यरत नऊ संस्थांमध्ये ५,१९४ कुष्ठरुग्णांची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे महारोगी सेवा समिती आनंदवनात  आहेत. येथे साडेतीन हजारांहून अधिक कुष्ठरुग्णांची नोंद आहे. शासनातर्फे २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरिता प्रतिरुग्ण दोन रुपये दरमहा अनुदान देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अमरावती येथील तपोवनात विदर्भ महारोगी सेवा मंडळात एकूण ६५४ कुष्ठरुग्णांची नोंद आहे. या संस्थेला १२ लाख,४८ हजार ३४७ रुपये यंदा अनुदान देय राहील; तर चंद्रपूर जिल्ह्यातील महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा संस्थेत ३६०० कुष्ठरोगी असून; त्यांच्या देखभालीसाठी ७२ लाख रुपयांचे अनुदान देय आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे अखिल  भारतीय कुष्ठरोग निवारण समितीमध्ये १०० कुष्ठरुग्ण असून या संस्थेला अनुदान मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील आमला विश्‍वेश्‍वर येथील श्रीगुरुदेव कुष्ठसेवा मंदिर या संस्थेत ५३  कुष्ठरोगी असून; त्यांच्या देखभालीसाठी १० लाख ७५७ रुपये देय आहेत. तर महारोगी आश्रम काशीखेड (धामणगावरेल्वे, जि. अमरावती) या संस्थेत ९० कुष्ठरुग्णांसाठी १ लाख ६३ हजार १५४ रुपये देय आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कुष्ठरोग पुनर्वसन केंद्र गोरापूर वडाळा मिशन संस्थेत १९६ एवढे कुष्ठरोगी असून; त्यांच्यासाठी ३ लाख ६६ हजार ८९५; तर महात्मा गांधी शिक्षण संस्था चावर्दा (जि. बुलडाणा) येथे २४० रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार आणि सॅनिटोरिअम फॉर लेप्रसी पेशंट वीरमांडकी (जिल्हा पुणे) येथील संस्थेत २१ कुष्ठरोगी असून त्यांच्यासाठी शासनाकडून सप्टेंबर २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीतील ३९ हजार ५८ रुपये देय आहेत. रायगड जिल्ह्यातील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन नेरे या संस्थेला जानेवारी २०१६ ते जून २०१६ या कालावधीसाठी २४० रुग्णांकरिता ४ लाख ६३ हजार ३३८ रुपये  देय आहेत. या सर्व संस्था शासनाच्या अटींची पूर्तता करीत असल्याने त्यांना प्रत्येक रुग्णाला दरमहा दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते. २०१६-१७ या कालावधीत देण्यात येत असलेली ही रक्‍कम १ कोटी २ लाख ५३ हजार एवढी आहे. २१ मार्च २०१२च्या शासननिर्णयानुसार हे अनुदान देण्यात येते.